शेतकऱ्यांना विम्याच्या पैशाची प्रतीक्षा

| खांब | वार्ताहर |

गतवर्षी अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे हजारो हेक्टर आंबा पिकाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळण्याची आशा होती. मात्र, दसरा-दिवाळी झाली तरीही शेतकऱ्यांना ही भरपाई मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

रोहा तालुक्यातील काही विभागातील (मंडळ) फळ बागायतदार शेतकरीवर्गाला अद्याप विम्याचे पैसे न मिळाल्याने त्यांना विम्याच्या पैशांची प्रतिक्षा करावी लागली असल्याने त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील घोसाळे मंडळ एकूण लाभार्थी 152, निडी तर्फे अष्टमी एकूण लाभार्थी 41, (दापोली) चणेरा एकूण लाभार्थी 22 लाभांपासून वंचित असल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे.

रायगड जिल्ह्यातील जवळपास बहुतांश तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंबा पिकांची लागवड केली जाते. तर बहुतांश शेतकरीवर्गाची रोजीरोटीही यावरच अवलंबून असते. परंतु, अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे हजारो हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर आर्थिक बेकारीची कुऱ्हाडच कोसळली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शासनाकडून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील बागायतदारांना पीक विम्याची भरपाई मिळाली आहे. परंतु, रोहा तालुक्यातील काही विभागातील शेतकरी या भरपाईपासून अद्याप वंचित राहिल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. तरी, ही भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version