| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत चौक तथा सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौक, तुपगाव, पाली खुर्द या शेतकरी आपल्या जमीन या सांडपाण्यापासून वाचविण्यासाठी शासकीय उंबरठे तसेच अनेकवेळा पत्रव्यवहार व उपोषण करुनसुद्धा पदरी निराशेशिवाय काही पडत नाही. 26 जानेवारीला खालापूर येथे उपोषण केले असताना ग्रुप ग्रामपंचायत चौक, पंचायत समितीने या तीन महिन्यांत प्रकल्प उभा करुन कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते पूर्ण न केल्यामुळे 5 जूनला आम्ही पंचायत कार्यालयासमोर फाशी घेणार असल्याचे यशवंत सकपाळ यांनी जाहीर केले.
दरम्यान, सकपाळ शेतकरी हे टोकाचे पाऊल उचलत असताना ग्रामपंचायतीचे धाबे दणाणले असून, शुक्रवारी तातडीने विशेष सभा आयोजित करण्यात आली तसेच शेतकरीवर्गांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. आम्ही मंगळवारी अभियंत्यांना बोलावून पाहणी करु, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आमच्या जमिनी नापिक होत असताना आम्ही खायाचं काय, असा प्रश्न यावेळी निर्माण केला. नैसगिक नाल्याला गटारांचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे डासांची निर्मिती होत असून, येथील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र, प्रत्येक वेळी आम्हा शेतकरी बांधवांस काम पूर्ण करुन तुमच्या समस्या मार्गी लावू, असे आमिष दाखवून शेतकरीवर्गाची मोठी फसवणूक करीत आहे. या अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले. ग्रुप ग्रामपंचायत नेहमी नागरिकांच्या समस्या अथवा विविध माध्यमांचा दुवा असून, ते सोडविण्यासाठी तप्तर असते. मात्र, येथील बिल्डरच्या सहमताने या परिसरात सध्या घाणींचे गटारांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांपासून या होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, शेती नुकसान टाळावे, नैसर्गिक नाल्याला गटारांचे स्वरुप मिळू नये यासाठी सातत्याने निवेदन देऊनसुद्धा चौक, तुपगाव पाली (खु.) येथील ग्रामस्थांना केराची टोपली दाखविली जात आहे. यामुळे संतप्त झालेले यशवंत सकपाळ 5 जूनला फाशी घेणार असे जाहीर केले.
गेले दोन वर्षे या परिसरातील शेतकरी या सांडपाण्याच्या संदर्भात आवाज उठवित आहे. नैसगिक नाल्याला गटाराचे स्वरुप प्राप्त करुन आमच्या जमिनी नापिक होत चालल्या आहेत. यासाठी आम्ही शेतकरी अनेक वेळा उपोषण, आंदोलन केले. मात्र, सातत्याने ग्राम पंचायत आश्वासन देत असून, आम्हा शेतकरी बांधवांची फसवणूक करीत असल्यामुळे मी आणी माझे शेतकरी बांधव 5 जूनला पंचायत कार्यालय समोर फाशी घेणार असल्यांचे अनेक ठिकाणी पत्रव्यवहार करुन नमूद केला आहे.
यशवंत सकपाळ,
पीडित शेतकरी