। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल-सायन मार्गावर एसटी महामंडळाच्या बसचा शुक्रवारी (दि.19) भीषण अपघात घडला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता कि, यामध्ये एसटीमधील 19 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
![](https://krushival.in/grygrars/2024/04/st-1-1024x768.jpg)
मिळालेल्या माहितीनूसार, जव्हार-पंढरपुर ही बस पनवेल-सायन मार्गावरुन प्रवास करीत होती. यावेळी आसूड गावाजवळ आले असता बसची जोरदार धडक लागली. या धडकेत एसटीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.