पाली-खोपोली मार्गावर भीषण अपघात; दोघेजण गंभीर

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली-खोपोली मार्गावर चिवे गावाच्या हद्दीत मोटारसायकलचा अपघात झाला असून या अपघातात खवली येथील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

पाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप जीप क्रमांक एमएच 14 एचजी 9431 हे वाहन चालक शांताराम शेळके हे खोपोली बाजूकडून पालीकडे जात होते. यावेळी चिवे गावाच्या हद्दीत आले असता चिवे गावाकडून येणारी एक मोटार सायकल एमएच 06 सीई 3313 ही अचानक रस्त्यावर आल्याने पिकअपचे समोरील बंपरला ठोकरून अपघात झाला.

या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातामधील जखमी तरुणांना पाली प्राथमिक उपचार केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एम.जी.एम रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिर्के करीत आहेत.

Exit mobile version