तरुणीवर जीवघेणा हल्ला

| वर्धा | प्रतिनिधी |

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडी इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात एकतर्फी प्रेमातून  एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सहा वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरात कुणी नसल्याचे पाहून घराच्या आवारातच या तरुणाने हल्ला केला आहे.  प्रथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.  

Exit mobile version