आदिवासीवाडीतून बाप व मुलीला  पळविले

अज्ञात इसमावर गुन्हा दाखल
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील  पाणोसे आदिवासीवाडी येथून  बाप व मुलीला फूस लावून पळविल्याने अज्ञात इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद भिका रोहिदास कोळी (वय-30) रा.पाणोसे आदिवासीवाडी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
 

भिका रोहिदास कोळी याचे पती रोहिदास गणपत कोळी (वय-32),उंची पाच फूट,नाक सरळ ,चेहरा गोल,अंगाने सडपातळ,केस काळे,अंगात नेसूस पांढर्‍या रंगाचा फुल हाताचा शर्ट व जांभळ्या रंगाची जीन्स पॅन्ट,पायात पांढर्‍या रंगाचे बूट व मुलगी रोहिणी रोहिदास कोळी(वय-7),रंग सावळा,उंची तीन फूट, नाक सरळ ,चेहरा गोल,अंगाने मजबूत, केस काळे अंगात नेसूस जांभळ्या रंगाचा फ्रॉक पायात काळ्या रंगाची सँडल अशा वर्णनाच्या या व्यक्तींना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात   फूस लावून पळून नेले आहे.

Exit mobile version