प्रकाश म्हात्रे यांना पितृशोक

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विष्णू फाल्गून म्हात्रे यांचे बुधवारी (दि.1) वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. प्रकाश म्हात्रे यांचे ते वडील होतं. विष्णू म्हात्रे यांनी खारेपाटात शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घरोघरी फडकविण्याचे काम त्यावेळी केले. रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिवंगत प्रभाकर पाटील यांच्या सोबत त्यांनी काम केले आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. शेकापचा एक सच्चा कार्यकर्ता हरपला असून, म्हात्रे कुटूंबियात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version