नाणी नदीवरील बंधारा नादुरुस्त होण्याची भीती

झाडाच्या मोठ्या ओंडक्यामुळे सिमेंट बंधार्‍यालाच धोका
। नेरळ । वार्ताहर ।
भीमाशंकर अभयारण्यात उगम पावणारी आणि कर्जत तालुक्यातून वाहणारी नाणी नदीवरील नांदगाव येथे असलेल्या कोल्हापूर टाईपच्या बंधार्‍यात महापुराच्या पाण्यासोबत वाहून आलेलं झाड अडकले आहे. त्या झाडाच्या मोठ्या ओंडक्यामुळे सिमेंट बंधार्‍यालाच धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, नांदगाव ग्रामपंचायतीने झाडांचे ओंडके बंधार्‍याबाहेर काढण्याची आवश्यकता आहे. मात्र त्या झाडाच्या ओंडक्यामुळे यावर्षी त्या बंधार्‍यात पावसानंतर पाणी देखील साचून राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाणी नदी हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य बांधणीपासून महत्वाची ठरली आहे.

सह्याद्रीच्या नाणे घाटात उगम पावणार्‍या या नाणी नदीच्या बाजूने भीमाशंकर अभयारण्यात जाण्यासाठी पूर्वी बैलगाडीचा मार्ग होता. कर्जत तालुक्यातील नांदगाव आणि खांडस भागातील लोकांची भीमशंकर आणि घाटमाथ्यावर जाण्यासाठी नाणे घाटमार्ग जाणारा रस्ता 2005 च्या महापुरानंतर बंद झाला आहे. त्यामुळे नाणे घाटातून वाहत कर्जत तालुक्यात येणार्‍या नाणी नदीच्या पाण्याबरोबर भीमाशंकर अभयारण्य मधील असंख्य झाडे हि महापुराच्या पाण्यासोबत वाहत येत असतात. त्यातील एक मोठे झाड यावर्षी वाहून झाली आणि नांदगाव येथे नाणी नदीवर बांधले गेलय. त्या झाडाच्या ओंडक्यांचा आकार एवढा मोठा आहार कि त्या सिमनेत बंधारा वाहून नेऊ शकतो. अशा स्थितीत बंधार्‍याच्या पाणी अडविण्याचा मार्गावर ते झाड अडकून राहिले आहे.या झाडामुळे नाणी नदीवरील या बंधार्‍यात पाणी अडवणे देखील कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे या बंधार्‍यात पाणी अडविण्यासाठी लावाव्या लागणार्‍या लोखंडी पट्ट्या देखील लावता येणार नाही. त्यामुळे पाणी अडवणे कठीण असून नांदगाव जवळ असलेला हा बंधारा डिसेंबर महिन्यातच कोरडा पडलेला दिसून येणार आहे.

Exit mobile version