| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेले नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व आर्किटेक्ट सुरेश जैन तसेच नागोठण्यातील सर्व भागातील पाणीपुरवठा उच्च दाबाने सुरळीत करण्याची कामगिरी करणारे ग्रामपंचायतीचे प्लंबर हरेष शिर्के यांना अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नागोठणे ग्रामपंचायतीकडून गौरविण्यात आले. यावेळी सरपंच सुप्रिया महाडिक व उपसरपंच अखलाक पानसरे तसेच शिवसेना नेते किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
नागोठणे ग्रामपंचायतीकडून सत्कार
