सेजल घुमकर यांचा सत्कार

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील नांदगावच्या श्रीमंत ज्ञात गंगा भंडारी समाजाच्या महिला मंडळातर्फे व रथसप्तमी हळदीकुंकू समारंभानिमित्त नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सेजल सुदेश घुमकर यांचा समाजातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी समाजसेविका परेरा यांनी उपस्थित महिलांना स्वच्छतेबाबत माहिती दिली. तसेच घर व परिसरातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येकी दोन दोन पिशव्यांचे वाटप केले. भंडारी समाजातील सर्व महिलांना हळदीकुंकवाचे वाण देण्यात आले.

यावेळी स्मिता खेडेकर, अर्चना खोत, मनाली मयेकर, श्रध्दा भाटकर, सुचित्रा खेडेकर, पुष्पलता साखरकर, श्रध्दा पेडणेकर, पुर्वा पेडणेकर, शितल खेडेकर, सुर्वे, पुलेकर, कांबळे, साखरकर, खेडेकर, धामणस्कर आदी समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version