महाबँकेतर्फे गुरुजनांचा सन्मान

। पनवेल । वार्ताहर ।
बँकिंग उद्योगात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई झोनच्या अंतर्गत येणार्‍या नवीन पनवेल शाखेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिन मोठ्या थाटात साजरा केला. याप्रसंगी महात्मा फुले महाविद्यालय, पनवेलचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. नरेश मढवी, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुभाष भोपी, बँकेच्या नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, पुष्पा खत्री, उप प्रबंधक, शुभांगी शुक्ला व विशेष सहाय्यक, अरविंद मोरे उपस्थित होते.
यावेळी सुभाष भोपी, प्रो. डॉ. नरेश मढवी, शाखा प्रबंधक पुष्पा खत्री आदींनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित शिक्षक डॉ प्रो. नरेश मढवी, सुभाष भोपी, संदीप जुईकर, संजय सावळे, सज्जाद पठाण, सारिका रघुवंशी, रजनी इंगळे, स्वाती खराडे, मीना फुलपगारे, प्रतिभा कुडेकर, गोपीनाथ थळी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती स्वाती खराडे, संदीप जुईकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेने सत्कार केल्याबद्दल बँकेचे आभार मानून बँकेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशश्‍वीतेकरिता सीमा मराठे, राजू म्हात्रे व रेखा जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version