| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली सर्कल समोरील, बिमा ब्रिजच्या सुरूवातीस पनवेल मुंब्रा रोड कळंबोली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा व तिच्या मैत्रिणीचा एका दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास यातील तक्रारदार महिला ही आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात कळंबोली सर्कल समोरील, बिमा ब्रिजच्या सुरूवातीस पनवेल मुंब्रा रोड कळंबोली येथे आलेल्या एका दुचाकीस्वाराने दुचाकीवरील महिलेकडे पाहून अश्लिल हातवारे व इशारे करण्यासह धक्का दिला. तसेच महिलेच्या मैत्रिणीला हाताने मारहाण करण्यासह शिवीगाळ करून पलायन करण्याचा प्रकार घडला. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा विनयभंग करणाऱ्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीचा नंबर तक्रारीत नमूद केला आहे. या तक्रारीवरून दुचाकीस्वाराविरोधात कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिला दुचाकीस्वाराचा विनयभंग

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606