चौलमध्ये महाकाली मातेचा उत्सव

| रेवदंडा | वार्ताहर |

त्वष्टा कासार समाज बांधवाचे श्रध्दा व भक्ती असलेल्या चौल बेलाई येथील प्राचीन महाकाली मंदिर चौल येथे वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

त्वष्टा कासार ज्ञाती संस्थान, रेवदंडा यांच्यावतीने रविवार, दि. 19 मे रोजी चौल दक्षिण भागातील कालिका टाकीनजीक महाकाली मंदिरात वार्षिक यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने सकाळी 9 वाजता चंद्रकांत दांडेकर यांचे रेवदंडा निवासस्थानाहून पालखी सोहळा, सकाळी 11 वाजता देवीची महापूजा व वाडी भरणे सोहळा, 11.30 वाजता हळदीकुंकू व पाहुण्यांचा ओळख परिचय व सत्कार कार्यक्रम, दुपारी 1 वाजता देवीची आरती व महाप्रसाद, दुपारी 2 ते 5 पर्यंत स्थानिक महिलांचे कार्यक्रम, सायकांळी 5.30 ते 7.00 पर्यंत महाकाली भजन मंडळ रेवदंडाचा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास पूजेचा मान ठाणे येथील उद्योजक अभिषेक पोरे व नेहा पोरे यांना देण्यात आला होता. या उत्सवानिमित्त रेवदंडा, चौल विभागासह संपूर्ण रागयड जिल्ह्यातील व ठाणे, मुंबई आदी शहरांतील विखुरलेला त्वष्टा कासार समाज बांधव व भगिनी यांनी महाकाली मातेचा वार्षिक उत्सवात सहभाग घेतला होता.

या उत्सवासाठी त्वष्टा कासार समाजाच्यावतीने अध्यक्ष ॠषी वडके, कार्यवाह गणेश वडके, खजिनदार अमोल वडके, सदस्य ओमकार वडके, सदस्य प्रशांत वडके, सल्लागार शंकर वडके, मंगेश वडके तसेच समस्त त्वष्टा कासार कार्यकर्ते व महाकाली महिला मंडळ, रेवदंडा यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version