पुण्यातील घोरपडे पेठेत भीषण आग

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यात गुरुवारी (दि. 17) पहाटे घोरपडे पेठेतील जुन्या वाड्याला आग लागली. या आगीत पाच घरे आणि एका दुकानाचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घोरपडे पेठेतील पंचहौद टॉवरजवळ असलेल्या दुमजली जोशी वाड्याला गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. यात पाच घरे आणि दुकान जळून मोठे नुकसान झाले. तसेच, घरात वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर करुन ठेवण्यात आलेल्या कपड्यांच्या साठ्याचेही आगीमुळे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नाही.

Exit mobile version