। उस्मानाबाद । प्रतिनिधी ।
उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. मंगळवारी (19 ऑक्टोबर) रात्री 10 च्या सुमारास शहरातील विजय चौक येथे ही घटना घडली.
या दगडफेकीत विजय चौक येथे पोलीस बंदोबस्तासाठी असलेले 4 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत, तहसिलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी पोहचून तातडीने कारवाई केली. मुघल राजा औरंगजेबाविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर हा वाद उफाळला आहे.