निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या चिरनेर येथील शिवधन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतपेढी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक वर्ष 2022-23 ते वर्ष 2027-28 करिता शिवधन सहकार पॅनल (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र गायकवाड, सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्याकडे दि. 3 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी उरणचे माजी आ. मनोहर भोईर, शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शिवधन पतपेढीचे विद्यमान चेअरमन व उमेदवार गणेश म्हात्रे, व्हाईस चेअरमन व उमेदवार गजानन वशेणीकर, महिला आघाडी संघटिका ज्योती म्हात्रे, चिरनेरचे शाखाप्रमुख समाधान ठाकूर, शाखा खजिनदार सुरेश म्हात्रे, सदस्य धर्मेंद्र म्हात्रे, धनेश ठाकूर, उपशाखा प्रमूख करण नारंगीकर, तेजस ठाकूर,अभिजित पाटील, रमेश म्हात्रे तसेच उमेदवार अनंत गोमा पाटील, विलास ठाकूर, अशोक फोफेरकर, दत्तात्रेय म्हात्रे, अमित चिरनेरकर, विवेक केणी, दीपक ना.पाटील, रेणुका ठाकूर, रंजना म्हात्रे. व शिवधन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतपेढीचे सभासद उपस्थित होते.

Exit mobile version