आरक्षणाचा अंतिम निर्णय सरकारचाः शरद पवार

| सोलापूर | प्रतिनिधी |

मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही काय करतायत याकडे आमचे लक्ष आहे. दोन्ही सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा आणि समाजासमाजात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

शरद पवार हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मराठा आरक्षण मिळेल का असे सवाल त्यांना करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीत मला देखील बोलवण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकराने यासाठी निर्णय घ्यावा, असे या बैठकीत भूमिका मांडली. ज्याला सर्वच पक्षाने पाठींबा दिला होता.

मध्यप्रदेशमध्ये जर भाजपचे सरकार आले, तर राम लल्लाचे दर्शन मोफत दिले जाईल असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. यावरच बोलताना शरद पवार म्हणाले की, दर्शन फुकट घडवू म्हणतात, पण मंदिरात जायला पैसे लागतात का? एखादा व्यक्ती पंढरपूरला गेला, तर त्याला दर्शनासाठी पैसे द्यावे लागत नाही. पण रामलल्लाचे दर्शन फुकट घडवू म्हणतात. याचा अर्थ राज्यकर्ते एवढ्या पातळीवर पोहोचले आहेत की, त्याची चर्चा न केलेली बरी, असेही शरद पवार म्हणाले.

Exit mobile version