| नवी दिल्ली | वार्ताहर |
अखेर जो रूटला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात, जो रूटला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएल पदार्पण करण्याची ही संधी मिळाली. वास्तविक, रुटने भारतात पदार्पण करण्याची ही चौथी वेळ आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासोबतच रूटने भारतात खेळताना कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आहे.