अखेर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्या कारणाने डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. आणि आज शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

मागील आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना (दि.31) मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आज (दि.7) आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Exit mobile version