| सुधागड -पाली | प्रतिनिधी |
पाली-खोपोली राज्य महामार्गावर चीवे गावाजवळ म्युझिक सिटीच्या समोर गुरुवारी (दि.29) कार व दूचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्यांपैकी पतीचा मृत्यू झाला तर पत्नी मीनाबाई हेमराज पाटील गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी (दि.2) दुपारी उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज संपली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच एमएसआरडीसी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व राग व्यक्त केला जात आहे.
हा अपघात इतका गंभीर होता की कारच्या एअरबॅग उघडल्या गेल्या. तसेच मोटारसायकलचे प्रचंड नुकसान झाले. भर पावसात हा अपघात झाला. त्यामुळे लागलची मदत पोहचू शकली नाही. यावेळी जखमी अपघातग्रस्त तिथेच भर पावसात पडून होते. काहीवेळाने रुग्णवाहिका आल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.