अलिबाग | वार्ताहर |
नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त नाबार्ड व आरडीसीसी बँक यांच्या संयुक्त माध्यमातून महिला बचतगट व शालेय विद्याथीर्र् तसेच शेतकरी वर्ग यांच्यासाठी आर्थिक व डिजिटल साक्षरता या कार्यक्रमाचे नांदगाव शाखेतर्फे तीन दिवस आयोजन करण्यात आले. दि. 1, 2, 3 जुलै असे तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास नांदगाव शाखेचे शाखाधिकारी सागर प्रभाकर वर्तक व मुरूड तालुका शाखाधिकारी गणेश पुगावकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नांदगाव विविध कार्यकारी सह. सोसायटीचे चेअरमन तसेच सचिव व मुरूड तालुका निरीक्षक यांनीसुद्धा हजेरी लावली.
यावेळी बँकेच्या तसेच नाबार्ड बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. बँकेच्या होम सेव्हिंग, वैयक्तिक सेव्हिंग, आर.डी. तसेच महालक्ष्मी ठेव इत्यादी ठेवी तसेच शैक्षणिक, गृहतारण, वाहनतारण कर्ज, शेती मध्यम मुदत कर्ज अशा अनेक प्रकारच्या कर्जाची माहिती सांगण्यात आली. तसेच एटीम कार्ड व एसएमएस सुविधा तसेच बँकेच्या अॅपची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात कोरोनाचे काटेकोरपणे नियम पाळून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.