एअर इंडियाच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांना मिळणार आर्थिक लाभ

आ. रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

| अलिबाग | वार्ताहर |

एअर इंडियामधून सेवानिवृत्त झालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरचे सर्व सेवाविषयक लाभ कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजप आ. रमेश पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मिळणार आहेत. यामुळे एअर इंडियामधून सेवानिवृत्त झालेल्या मुंबईतील सर्व कर्मचार्‍यांनी आ. पाटील यांचे आभार मानले.

गेल्या 40 वर्षांपासून केंद्र शासन व त्यांच्या अंगीकृत विभागातून सेवानिवृत्त झालेल्या पण सेवानिवृत्तीनंतर कोणतेही लाभ न मिळालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचार्‍यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यामुळे हे सर्व कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता. या अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचार्‍यांकडून वारंवार हा प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची आ. रमेश पाटील यांच्याकडे मागणी होत होती. त्या अनुषंगाने या सर्व कर्मचार्‍यांना सर्व सेवाविषयक आर्थिक लाभ मिळण्याकरिता आ. पाटील गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत होते.

दरम्यान, प्रलंबित सेवा विषयक आर्थिक लाभ लवकर सर्व कर्मचार्‍यांना देण्यात येतील, असे आश्‍वासन खा. किरीट सोलंकी यांनी आ. रमेश पाटील यांना दिले होते. त्यानुसार एअर इंडियामधील सेवानिवृत्त झालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचारी बांधवांना प्रलंबित सेवाविषयक लाभ लवकरच मिळणार असल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली. तसेच हे सर्व कर्मचार्‍यांच्या एकजुटीमुळे व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version