सेवानिवृत्त शिक्षकाची आर्थिक फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।

वेगवेगळ्या एटीएमसेंटरमध्ये जाऊन डेबिट कार्डमधून 59,147 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर नागेश्वर पाटील (रा. सेक्टर 13, नवीन पनवेल) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते सेक्टर 19 येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन हातचलाखीने डेबिट कार्ड स्वतःजवळ ठेवून त्याऐवजी दुसरे बँकेचे डेबिट कार्ड दिले आणि एटीएमचा पिन प्राप्त करून त्यांच्या एसबीआय बँकेच्या डेबिट कार्डमधून वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून 59,147 रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार केली असता पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Exit mobile version