वर्क फ्रॉम होमच्या नावाने आर्थिक फसवणूक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वर्क फ्रॉम होमच्या नावाने अलिबागमधील एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या व्यक्तीच्या खात्यातून सूमारे 15 लाख 65 हजार 640 रुपयांची लुट करण्यात आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किशोर साळे अधिक तपास करीत आहेत.

सोशल मिडीयाचा आधार घेत आरोपीने फिर्यादीला वर्क फ्रॉम होमद्वारे काम देतो, असे सांगून विश्‍वास संपादन केला. टेलिग्रामद्वारे एक लिंक पाठविण्यात आली. फिर्यादीचा विश्‍वास मिळवून त्यांच्या बँक खात्यातील सर्व माहिती उपलब्ध करून घेतली. त्यानंतर ते पाठविण्यास सांगितले. चांगली रक्कम मिळणार या आशेने फिर्यादीने 15 लाख 65 हजार 640 रुपये ऑनलाईनद्वारे पाठविले. त्यानंतर परत पाच लाख रुपये भरावे लागतील, असे सांगूून लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना नऊ जून ते 16 जूलै या कालावधीत घडली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version