सुरेश धस यांचा थेट धनंजय मुंडेंवर निशाणा
| बीड | प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. संतोष देशमुख यांची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली, त्यामागे जातीय कारण नव्हते, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढत सुरेश धस यांनी संतोष देशमुखची हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो, मी पण जिल्ह्यातच राहातो, असे वक्तव्य केले आहे.
मंगळवारी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संतोष देशमुख या तरुण सरपंचाची हत्या झाली. त्याचे आरोपी फरार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी सांगितलंय मारेकरी मोबाइल आणि गाडी बार्शीजवळ सोडून पळून गेलेत. मारहाण करत असताना व्हीडिओ रेकॉर्ड करत दाखवला आहे. त्यालादेखील 302 चा आरोपी केले पाहिजे. मारहाणीनंतर संतोष देशमुखला पाणीदेखील दिले नाही, दोन तास त्यांना मारहाण केली. मी एसआयटी नियुक्तीसंदर्भात पत्र दिले आहे. आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे. सीआयडीला नावं ठेवत नाही, मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली. आज किंवा उद्या एसआयटी गठीत होईल, त्यानंतर क्शन होईल. विमा कंपन्यांबाबत काही प्रकार होतात, त्यात डाटाचा वापर करतात. यांचे कोणाला कुठे कॉल झाले, काही ट्रॅन्झॅक्शन झालेत का? संतोष देशमुख सरपंच तिसर्यांदा झाला होता, लवकरात लवकर आरोपींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
ज्यांनी संतोष देशमुखचा मुडदा पाडला त्यांचा आका शोधला पाहिजे. मारेकर्यांचे शागीर्द कोण, हे शोधले पाहिजे, असेही सुरेश धस यांनी म्हटले.