| मुंबई | प्रतिनिधी |
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लोकल सेवा ही मुंबईचा कणा आहे. मुंबईत बऱ्याच गोष्टी लोकलवर अवलंबून असतात. लोकलच्या वेळेत बदल झाला किंवा बिघाड झाला, तर मुंबईकर अक्षरक्ष: हैराण होतात.
मुंबईकरांच दिवसाच वेळापत्रक लोकलच्या वेळेनुसार ठरतं. मुंबईकर हे लोकल सेवेवर अवलंबून असतात. अशावेळी मुंबईची लोकल सेवा कोलमडली तर नोकरदारांचे चांगलेच हाल होतात.
मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलवर प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. दररोज 70 ते 75 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. नोकरीसाठी अगदी कर्जत-कसाऱ्यावरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. निदान उत्सव काळात तरी लोकल सेवा सुरळीत सुरु रहावी, अशी अपेक्षा असते. पण बुधवारी (दि.20) मध्य रेल्वे विस्कळीत झाली. बदलापूरवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.