| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यावर बुधवारी (दि.20) सात तास चर्चा होणार आहे. विधेयक मंजूर झाल्यास महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजुरीला ठेवलं आहे.
महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्याचा त्यामुळे मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी महिलांची संसदेतील संख्याही वाढणार आहे. अधिकाधिक महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवावा आणि स्त्री-पुरुषांमधील भेदाची दरी मिटवावी या हेतूने हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होणार का? झालं तर ते याच निवडणुकांमध्ये लागू होईल का? असे सवाल या निमित्ताने विचारले जात आहेत.