करंजाडे येथील इमारतीला आग

| पनवेल | वृत्तसंस्था |

करंजाडे येथील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शिव कमल बिल्डिंग रुम-304, प्लॉट नं 165, करंजाडे येथे एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या आगीत घरातील थोडया फार प्रमाणात नुकसान झाले आहे. याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. आगीची माहिती पनवेल शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कुणाल लोंढे करंजाडे पोलीस पाटील यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे, यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Exit mobile version