सॅन्डविचच्या दुकानाला आग

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील कोप्रोली येथील चौकात असलेल्या गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला मंगळवारी (दि.28) दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला दुपारच्या वेळेत अचानक आग लागली व ज्वाला भडकू लागल्या. यावेळी आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याने सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत एका सिलेंडरचा स्फ़ोट देखील झाला आहे. या दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणे, विविध सामान, वस्तू, अन्न पदार्थ, मशीन, फ्रीज, फॅन, बसण्याचे खुर्च्या टेबल आदी वस्तूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. किमान अडीच लाखाहून जास्त किंमतीच्या मालाचे, वस्तूचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. अग्निशमनच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

Exit mobile version