| महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुख्य बाजारपेठेतील चामुंडा साडी सेंटर येथे भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या साडीच्या दुकानाला आग लागल्यामुळे दुकानातील सर्व मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग एवढी भीषण होती की पूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ही घटना समजल्यानंतर महाड येथील अग्नीशमन दलाच्यावतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.