भोपाळमध्ये बालरुग्ण विभागाला आग; चार बालके दगावली

भोपाळ | वृत्तसंस्था |
मध्यप्रदेशातल्या भोपाळ इथं कमला नेहरु रुग्णालयातल्या लहान मुलांच्या कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आत्तापर्यंत 4 मुलांचा मृत्यू झाला असून 36 मुलांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.
या रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर चिल्ड्रन्स वॉर्ड आहे. आग लागल्यानंतर रुग्णांना स्ट्रेचरवरुन बाहेर काढण्यात येत होतं. मात्र, या रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा मात्र गोंधळ उडाल्याचं दिसत होतं.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती हाती येत आहे.

Exit mobile version