चोंढी नाका येथील साई शक्ती बिअर बारला आग

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

चोंढी येथील एका बियर बारला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही मात्र बारचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचा अंदाज आहे. चोंढी नाका आदीत्य मोरे यांच्या मालकीचे साई शक्ती बिअर बार आहे. या बारमध्ये आज (15 ऑगस्ट) सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मांडवा पोलीस एपीआय धर्मराज सोनके यांची टिम घटनास्थळी पोहचली.
सोनके यांनी तातडीने आरसीएफ थळ कंपनी अग्निशमन वाहन व अलिबाग नगरपरिषद अग्निशमन वाहन यांना पाचारण केले व आग नियंत्रणात आणली आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र बार मालकाचे सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले आहे. यावेळी गावचे पोलीस पाटील, प्रसाद गायकवाड, गणेश भोईर, झिराड पोलीस जाधव, सोनके आदीने यावेळी महत्वपुर्ण भुमिका बजावली.

Exit mobile version