Fire News: संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाला आग

। महाड । प्रतिनिधी ।

महाड शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना पोस्ट परिसरात असलेल्या संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. गोदामाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून उशिरापर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नव्हते. आगीची माहिती मिळताच महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर महाड एमआयडीसी तसेच बिर्ला, लक्ष्मी, प्रिव्ही, विनती आदी कंपन्यांच्या अग्निशमन दलांनीही मदतकार्य सुरू केले. गोदामात तेल व माचिसचा साठा असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती. तर संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीच्या गोदामामध्ये असलेल्या एका सिलेंडरचा स्फोट झाल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे. दरम्यान स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व पोलिसांच्या मदतीने गोदामातील ज्वलनशील साहित्य बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version