watch video! खोपोलीतील अल्टा कंपनीत भीषण आग; दोघे गंभीर

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
खोपोलीतील अल्टा लॅबोरेटरीज कंपनीत भीषण आग लागल्याची घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दोन कामगार भाजून गंभीर जखमी झाले. कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की, चार ते पाच किलोमीटर परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. आगीत संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. आठ रिअ‍ॅक्टर जळालेत तर अक्षय पाटकर (वय -27 वर्ष) शिळफाटा, एक कर्जत मधील दोघे तरूण आगीत जखमी झाले. जखमींना जाखोटीया हाँस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त संस्थेच्या समसुचकतेमुळे आग आटोक्यात आणण्यास झाली मदत झाली आहे. जुन्या महामार्गावरील खोपोली येथील अल्टा लॅबोरेटरीज कंपनीत रिअक्टरमध्ये बिघाडामुळे आग लागली असल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.कामगारांनी सतर्कता दाखवत प्लँटमधील ड्रम बाहेर काढले.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे संतोष मोरे हे माउंटन व्ह्यू रेसिडेन्सी मधील एका कार्यक्रमात व्यस्त असताना त्यांना दुपारी 11.30 च्या दरम्यान अल्टा कंपनीमध्ये धूर दिसला. त्यांनी लागलीच ही खबर गुरुनाथ साठेलकर यांना दिली. साठेलकर यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोली अग्निशमन दल प्रमुख हरिदास सूर्यवंशी, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, तहसीलदार आयुब तांबोळी यांना या घटनेची माहिती दिली.अपघातच्या टीम मधील धनंजय गीध यांनी प्रत्यक्ष प्लांटमध्ये जाऊन ज्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न करून सुरक्षे संदर्भात कंपनी व्यवस्थापनाला सूचना केल्या.मंगलम कंपनी, टाटा स्टील, अला ना ऑईल इत्यादी कंपनीतील अग्निशामन दलाकडून आग विझवण्यासाठी बंब घटनास्थळी पाठवले गेले होते.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था.गुरुनाथ साठेलकर, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, शाहिद शेख यांनी खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन करणार्‍या जवानांना मदत केली.

Exit mobile version