संगणकाचे नुकसान; नर्सिंग होस्टेलच्या मुलींमध्ये घबराट
I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपंग कक्षाला बुधवारी रात्री आग लागली. या आगीत कक्षाचे नुकसान झाले असून एक संगणक निकामी झाला आहे. दरम्यान, सदर इमारतीत असलेल्या नर्सिंग होस्टेल च्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरून धावपळ उडाली होती. जिल्हा रुग्नालयाचे कर्मचारी मयुरेश पाटील व सुरक्षा कर्मचारी यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.