तळोजा वसाहतीत इमारतीला आग

fire isolated over black background

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा फेज एक वसाहतीमधील आर्चिड एन्क्लेव्ह या सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका घरात लागलेल्या आगीत घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.28) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ही आग घरातील वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे खारघर अग्निशमन विभागाचे अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले.

तळोजा सेक्टर- 12 मधील आर्चिड एन्क्लेव्ह सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावर तणवीर अलवारे हे कुटुंबासह वास्तव्य करीत आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बेडरूममधील वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्याचवेळी खिडकीतील पडदा आणि बाजूला असलेल्या लाकडी कपाटाने पेट घेतला. ही माहिती खारघर अग्निशमन केंद्राला मिळताच अग्निशमन जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत कपाटामधील घरांचे दस्तऐवज, पासपोर्ट आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याचे घरमालक तणवीर अलवारे यांनी सांगितले.

Exit mobile version