| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पालिका हद्दीतील आसुड गाव येथील झोपडीला आग लागण्याची घटना सोमवारी (दि.17) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल पालिकेच्या नवीन पनवेल अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवले. त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर चरस गांजा पिणारे येत असतात अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली त्या ठिकाणी संस्था तेथील मुलांकरिता ओपन शाळा भरवते. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून, आगीचे कारण स्पष्ट नसल्याचे सांगत आग लागली की लावण्यात आली. याचा शोध खांदेश्वर पोलीस घेत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.