| प्रयागराज | वृत्तसंस्था |
कुंभमेळ्याच्या परिसरात आग लागली. ही घटना मेळा परिसरातील शंकराचार्य मार्गावरील सेक्टर18 मधील यमुना पुरम सेक्टरमध्ये घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागली आणि काही मिनिटांतच ती आटोक्यात आणण्यात आली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. अग्निशमन दलाचे विशेष पथक आग कशामुळे लागली याचा शोध घेईल. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व काही नियंत्रणात आहे.
वेगवेगळ्या सेक्टरमधील तंबू आणि वाहनांना आग लागल्याची ही तिसरी घटना आहे. याआधी 30 जानेवारी रोजी सेक्टर-22 मध्ये भीषण आग लागली, ज्यामुळे 15 तंबू जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकांना आग आटोक्यात आणण्यात यश आले, ज्यामुळे अधिक नुकसान टाळता आले. त्याआधी सेक्टर-2 मध्ये आणखी एक आग लागली, ज्यामुळे दोन गाड्यांना आग लागल्याने घबराट पसरली. तथापि, अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.







