धावत्या टेंपोला आग

नागरिकांच्या प्रसंगावधानपणामुळे अनर्थ टळला

। उरण । वार्ताहर ।

उरण शहरातील गजबजलेल्या भर बाजारपेठेतून मंगळवारी (दि.25) सकाळी 9 च्या सुमारास आग लागलेला टेंपो धावल्याचा थरारक नागरिकांनी अनुभवला. मात्र, नागरिकांच्या व वाहन चालकांच्या प्रसंगावधानपणामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदरची आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, आग लागलेल्या टेंपोमध्ये काय सामान होते, हे समजले नाही.

Exit mobile version