इम्रानखान यांच्यावर गोळीबार; लाहोरमध्ये घटना

। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली आहे. यानंतर त्यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे.

या आधी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनिझिर भुत्तो यांच्यावर गोळीबार करण्यात आली होती. त्यामध्ये बेनिझिर भुत्तो यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता या आधीच अनेकांनी व्यक्त केली होती. आता ती शक्यता सत्यात आली असून पाकिस्तानची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे.

Exit mobile version