उरूळी कांचन परिसरातील घटना
। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील उरूळी कांचन परिसरात इनामदार वस्तीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे या व्यक्तीने भरदिवसा तीन ते चार जणांवर गोळीबार केला. यात काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.
गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. तसेच भरदिवसा गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.