| पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील राबगाव ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महा आवास अभियान पुरस्कार 2021-22 राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी. आमदार धर्येशिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी या पुरस्कासाठी ग्राम पंचायतीला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सरपंच कविता केशव वाळंज, ग्रामसेवक योगेश गायकवाड, ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.