| खांब | प्रतिनिधी |
दुर्गवीर प्रतिष्ठान गेले अठरा वर्षे अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अपरिचित असलेल्या अनेक गडांवर गडसंवर्धन करण्याचे कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे आपण संवर्धन करत असलेल्या गडाचे पूजन होणे गरजेचे आहे. या उद्देशाने दसरा निमित्ताने रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ घेरासुरगड गावाजवळ असलेल्या सुरगड गडावर दसरा गड पूजन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दुर्गवीर सदस्य आणि खांब पंचक्रोशीतील सर्व दुर्गप्रेमी गडावर सकाळी 4 वाजता गडावर जमा झाले. प्रथम गडाची गडदेवता आन्साईमातेचे पूजन करून दिवे मशाली पेटवून देवीच्या मंदिराला उजळून टाकले. त्यानंतर भंडारा, गोंधळ, आरती करून गडावरील मारूती, शिवशंभू यांचीही पूजा आरती केली. तसेच, गडावर संवर्धन करण्यासाठी लागणारे अनेक अवजारे आणि पारंपारिक लढाई साठी लागणारे शस्त्र यांचीही पुजा करण्यात आली. यावेळी आलेल्या सर्वांनी ‘आधी तोरण गडाला, मग आपल्या घराला’ ही संकल्पना पार पाडली. यावेळी दुर्गवीर सदस्य किशोर सावरकर, किरण गायकर, भुषण पाटील आणि मित्र मंडळ, सुरगडाचे गडपाल महेंद्र पारठे आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
आधी तोरण गडाला मग घराला
