रतन टाटांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

| मुंबई | प्रतिनिधी |

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्योगरत्न पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‌‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‌‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‌‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‌‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.

Exit mobile version