बोंबलांची आवक घटल्याने दर वधारले

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

खिशाला परवडणारा म्हणून सर्वसामान्य मासळी खवय्याच्या पसंतीच्या बोंबील माशाचे दर सध्या वाढल्याने बोंबलापेक्षा कोंबडी बरी, असं मत मासेप्रेमी व्यक्त करत आहेत. थंड वातावरणाचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. मासळीची आवक घटली आहे. परिणामी, पनवेलच्या बाजारात सध्या मासळीचे दर गगनाला पोहोचले आहेत.

पनवेलच्या मासळी बाजारात बोंबील सध्या 400 रुपये किलो दराने विकले जात असून, पाच ते सहा बोंबलांचा वाटा 200 रुपये दराने विकला जात असल्याने सर्वसामान्य खवय्याच्या ताटातील मासळी गायब झाली आहे. थंडीच्या दिवसात मासे समुद्राच्या तळाजवळ जातात. त्यामुळे मासेमारी करणे कठीण होते. परिणामी, आवक घटत असल्याने मासळीच्या दरात वाढ झाल्याचे उमेश परेशे या मासळी विक्रेत्या सांगितले. सध्या घोळ माशाला चांगली मागणी असली तरी त्याच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. 800 किलोने विकला जाणारा घोळ मासा 1000 ते 1200 रुपये किलोने, तर मोठी सुरमई 1200 रुपये किलो, पापलेट आकरानुसार 500 ते 1000 रुपये किलो आणि हलवा 800 रुपये किलो दराने विकला जात आहे.

मासेअगोदरआता
सुरमय मोठी8001200
सुरमय छोटी400600
कलेट10001500
पापलेट600800
बोंबील200400
घोल8001000/1200
रावस6001000
कोलंबी400600
Exit mobile version