। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
खडताळ पुलाजवळील बामणोली येथे एका विद्युत वाहिनी बंडलमधील 30 मीटरची विद्युत वाहिनी केबल कापून दरोडा टाकित असताना आढळून आल्याने पाच जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
सदर घटना 03 जानेवारी 2022 रोजी 9:30 च्या सुमारास घडली. बामणोली जवळ 06 आरोपी हे एकत्र जमुन संघटीत होवुन एका विदयुत वाहीनी बंडल मधील 30 मिटरचे विदयुत वाहीनी केबल हॅक्सॉ ने कापुन दरोडा टाकित असताना मिळुन आले. सदर गुन्ह्यातील आयशर टेम्पोसहीत एकूण 5,70,000/-रुपये किमतीची विदयुत वाहीनी केबल, स्ट्रीट लाईटचे जुने पोल, गॅस कटर, दोन सिलेंडर, व इतर साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील 05 आरोपींनाकरण्यात आली आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे यथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि लहांगे हे करीत आहेत.