नांदेडमध्ये पाच भावांचा तलावात बुडून मृत्यू

| नांदेड | प्रतिनिधी |

नांदेडच्या कंधार येथील जगतुंग तलावात बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. यातील दोन सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलत आहेत. नांदेड शहरातील खुदबई नगर येथील दोन कुटुंब कंधार येथील दर्गाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. बुडून मरण पावलेले सर्वजण 15 ते 23 वयोगटातील आहेत. या सर्व मयतांवर कंधारच्या रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले.

Exit mobile version