जवानाच्या गोळीबारात पाच जवान शहीद

| अमृतसर | वृत्तसंस्था |
अमृतसरच्या खासा गावात एका बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटने बीएसएफचे पाच जवान शहीद झाले आहे. ही घटना रविवारी घडली. गोळीबार करणारा बीएसएफ कॉन्स्टेबल देखील मृत झाला आहे. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत चार बीएसएफ जवानांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मुख्यालय 144 बीएन खासा, अमृतसर येथे सीटी सत्तेप्पा एसके असे या आरोपीचे नाव आहे.या घटनेच्या तपासासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version