पाच वर्षीय मुलाचा शोषखड्ड्यात पडून मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पुणे | प्रतिनिधी |

केळगावच्या हद्दीत घरासमोर खेळत असताना सांडपाण्याच्या शोषखड्ड्यात पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 28) घडली. वीरेन गजानन खुणे (5) असे मृत मुलाचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन खुणे यांचा मुलगा वीरेन हा खेळत असताना शोष खड्ड्यात पडला. बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही म्हणून खुणे यांनी परिसरात शोधण्यास सुरुवात केली. सर्वत्र शोधल्यानंतरही तो सापडत नसल्याने त्यांनी दुपारी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आळंदी पोलीस ठाण्यात दिली. त्यादरम्यान, खुणे यांनी शोषखड्ड्यात पाहिले असता वीरेनचा शर्ट दिसून आला. त्यांनी त्याला बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version