स्वप्नपूर्ती गृहसंकुलात ध्वजारोहण

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघरमधील स्वप्नपूर्ती गृहसंकुलात सकाळी नऊ वाजता अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम निवृत्त सैनिक बजरंग तात्याबा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी संकुलात ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना राबवत जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवला होता. त्यानंतर संकुलातील मुलांनी आणि मुलींनी देशभक्तीपर गाणी आणि भाषणे केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील ज्येष्ठ नागरिक नंदकुमार राजे, नितीन सूर्यवंशी, कुमार गायकवाड, श्री. शेळके, माधव सखाराम, आनंद पुकाळे, संतोष व्हावळ, शंतनू चिकणे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरतकुमार कांबळे यांनी केले.

Exit mobile version